Hingoli : मराठा आरक्षणासाठी शोले स्टाईल आंदोलन, आंदोलकांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू
हिंगोली, ३१ डिसेंबर २०२३ | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलंय. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दोन दिवसात आरक्षण द्या, अन्यशा पुन्हा जलत्याग करणा असा इशारा दिलाय. दरम्यान, मराठा समाज आता आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत असून अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिसंक वळण मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. तर हिंगोलीत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक टॅावरवर चढले […]
हिंगोली, ३१ डिसेंबर २०२३ | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलंय. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दोन दिवसात आरक्षण द्या, अन्यशा पुन्हा जलत्याग करणा असा इशारा दिलाय. दरम्यान, मराठा समाज आता आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत असून अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिसंक वळण मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. तर हिंगोलीत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक टॅावरवर चढले आहेत. वसमत तालुक्यातील गिरगांव येथे मराठा आंदोलक BSNL कंपनीच्या टॉवर चढल्याचे पाहायला मिळाले. मराठा आरक्षण मिळावे, यासाठी आक्रमक आंदोलकांनी शोले स्टाईल आंदोलन केल्याने त्यांची जिल्ह्यात चर्चा सुरूये. वसमत तहसीलदार आल्याशिवाय आम्ही खाली उतरणार नाही अशी आंदोलकांची भूमिका आहे. यावेळी टॉवरवर मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. दरम्यान, पोलिसांकडून या आंदोलकांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहे.