श्रीकांत शिंदे यांना भर सभेत दाखवले काळे झेंडे अन् ‘त्या’ तरूणांना थेट स्टेवरच बोलावलं
या सभेत श्रीकांत शिंदे यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. काळे झेंडे दाखवणारे मराठा तरूण होते. या तरूणांना स्टेजवर बोलून शिंदेंनी समज दिली. ते तरूण म्हणाले आम्ही तुमचा निषेध केला नाही. केवळ लक्ष वेधण्यासाठी आम्ही आलो, असेही त्यांनी म्हटले.
परभणी, १० डिसेंबर २०२३ : खासदार श्रीकांत शिंदे आज परभणीच्या पाथरीत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेच्या अल्पसंख्यांक विभागाकडून आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात शिंदे हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. जेसीबीच्या सहाय्याने त्यांच्यावर फुलांची उधळण केली जात आहे. क्रेनच्या सहाय्याने एक क्विंटलचा हार श्रीकांत शिंदे यांना घालण्यात आल्याचे पाहायला मिळाले. तर यावेळी साई जन्मभूमी मंदिराला त्यांनी भेट दिली. पाथरीच्या जिल्हापरिषद मैदानात श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा झाली. या सभेत श्रीकांत शिंदे यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. काळे झेंडे दाखवणारे मराठा तरूण होते. या तरूणांना स्टेजवर बोलून शिंदेंनी समज दिली. ते तरूण म्हणाले आम्ही तुमचा निषेध केला नाही. केवळ लक्ष वेधण्यासाठी आम्ही आलो, इतकंच नाहीतर शिंदे साहेबांवर आम्हाला विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले आहे.