मराठा आणि कुणबी जात एकच की वेगळी? काय म्हणाले मंत्री नारायण राणे?

मराठा आणि कुणबी जात एकच की वेगळी? काय म्हणाले मंत्री नारायण राणे?

| Updated on: Oct 21, 2023 | 11:25 AM

tv9 Marathi Special Report | मराठा समाजाला कुणबीचं जातप्रमाणपत्र द्या, अशी मागणी वारंवार जरांगे पाटील करत आहेत आणि त्यासाठी त्यांनी 2004 च्या सरकारच्या जीआरचा आधार घेत भाष्य केलंय. याच जीआरवरुन जरांगेंचं म्हणणं आहे की, मराठा आणि कुणबी एकच आहे. मात्र नारायण राणे म्हणाले...

मुंबई, २१ ऑक्टोबर २०२३ | मराठा समाजाला कुणबीचं जातप्रमाणपत्र द्या, अशी मागणी वारंवार जरांगे पाटील करत आहेत आणि त्यासाठी त्यांनी 2004 च्या सरकारच्या जीआरचा आधार घेतलाय. ज्यात मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा असा उल्लेख आहे. मात्र मराठा वेगळे आणि कुणबी वेगळे आहेत असं नारायण राणे म्हणालेत. 2004 मध्ये तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारनं काढलेल्या जीआरमध्ये म्हटलंय की, कुणबी, पोट जाती- लेवा कुणबी, लेवा पाटील, लेवा पाटीदार यांना ओबीसीतून आरक्षण मिळतंय. दुसऱ्या कॉलममध्ये म्हटलंय की, नव्यानं समाविष्ट करावयाची तत्सम जात, मराठा कुणबी व कुणबी-मराठा… याच जीआरवरुन जरांगेंचं म्हणणं आहे की, मराठा आणि कुणबी एकच आहे. मात्र भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी म्हटलंय की, मराठा वेगळे आणि कुणबी वेगळे…तसंच मी 96 कोळी मराठा असून कुणबीचा दाखला आयुष्यात घेणार नाही, असे नारायण राणे म्हणाले.

Published on: Oct 21, 2023 11:25 AM