‘या’ मराठी अभिनेत्याची राजकारणात एन्ट्री, मातोश्रीवर हाती शिवबंधन बांधून करणार पक्षप्रवेश
मराठी अभिनेता आज आपल्या हाती शिवबंधन बांधणार आहे. मातोश्रीवर अभिनेता किरण माने उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश करणार आहे. आज मातोश्रीवर बीडसह, मराठवाड्यातील काही कार्यकर्ते देखील ठाकरे गटात पक्षप्रवेश करणार आहेत.
मुंबई, ७ जानेवारी २०२४ : मुलगी झाली हो.. बिग बॉस मराठी या टेलिव्हिजन शोमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला मराठी अभिनेता आज आपल्या हाती शिवबंधन बांधणार आहे. मातोश्रीवर अभिनेता किरण माने उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश करणार आहे. आज मातोश्रीवर बीडसह, मराठवाड्यातील काही कार्यकर्ते देखील ठाकरे गटात पक्षप्रवेश करणार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे आपल्याला एका वाहिनीने काढल्याचा आरोप किरण माने यांनी केला होता. तर आज सुषमा अंधारे यांच्या माध्यमातून हा अभिनेता राजकारणात उतरणार आहे. किरण माने हा अभिनेता अनेकदा वेगवेगळ्या विषयांवर आपली मते व्यक्त करत असतात त्यामुळे त्यांना कित्येकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागला आहे. आता ते थेट राजकारणाच्या रिंगणात उतरणार असल्याने नेटकरी कशा शुभेच्छा देतात हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.