Mumbai | एकनाथ शिंदेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेता मयुरेश कोटकरला पोलिसांकडून अटक

Mumbai | एकनाथ शिंदेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेता मयुरेश कोटकरला पोलिसांकडून अटक

| Updated on: Jun 15, 2021 | 1:15 PM

ठाण्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी मराठी अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे. मराठी कलाकार मयुरेश कोटकर (Mayuresh Kotkar) यांना ठाण्यातील श्रीनगर पोलिसांनी अटक केली.

ठाण्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी मराठी अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे. मराठी कलाकार मयुरेश कोटकर (Mayuresh Kotkar) यांना ठाण्यातील श्रीनगर पोलिसांनी अटक केली. कोटकर यांना आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. मयुरेश कोटकर यांनी अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

नवी मुंबई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी दि बा पाटील यांचे नाव देण्यात यावे, यासाठी आगरी समाजाने रस्त्यावर उतरुन मानवी साखळी तयार केली होती. त्यावेळीही मयुरेश कोटकर उतरले होते. त्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध कोटकरांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती.