अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले, कोणाचा झाला पराभव
VIDEO | अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या निवडणुकीत कोण जिकंल कोण हरलं?
मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक एप्रिलमध्ये झाली. त्यानंतर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या कार्यकारी समिती २०२३-२०२४ सालची निवडणूक मंगळवारी झाली. या परिषदेचं अध्यक्षपद नक्की कोणाला मिळणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागले होते. अखेर आज झालेल्या मतमोजणीत मराठी अभिनेता प्रशांत दामले यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडणुकीत प्रशांत दामले ६० पैकी ५० मतं मिळाली. तर प्रशासन उपाध्यक्षपदी नरेश गडेकर यांची, उपक्रम उपाध्यक्षपदी भाऊसाहेब भोईर यांची बिनविरोध निवड झाली आहे तर कोषाध्यक्षपदी सतीश लोटके यांची निवड झाली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदासाठी प्रसाद कांबळी यांचे आपलं पॅनल आणि प्रशांत दामले यांचं रंगकर्मी समूह या दोन गटात चांगलीच चुरस रंगली होती. प्रसाद कांबळी आणि प्रशांत दामले या दोघांत कोण जिंकणार याकडे साऱ्याचे लक्ष होते. तर या संपूर्ण निवडणुकीत प्रशांत दामले रंगकर्मी नाटक समूहाचा दबदबा पाहायला मिळाला. तर प्रसाद कांबळी, सुकन्या कुलकर्णी, ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांचा पराभव झाला.