Asawari Joshi यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचं कारण
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारी अभिनेत्री आसावरी जोशी (Asawari Joshi) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला.
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारी अभिनेत्री आसावरी जोशी (Asawari Joshi) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश का केला, या प्रश्नाचं उत्तर यावेळी आसावरींनी दिलं. “राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी प्रवेश का केला, असा सगळ्यांना प्रश्न पडला असेल. मी हा पक्ष का निवडला असा प्रश्न सगळ्यांच्या मनात नक्कीच असेल. मी कलाकार आहे आणि कलाकारांसाठी झटणारा असा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय दुसरा कुठला पक्ष आता माझ्या नजरेत नाही,” असं त्या म्हणाल्या.
Published on: Apr 07, 2022 02:20 PM
Latest Videos