शिंदे-फडणवीस सरकारमुळे कलाकारांना राजाश्रय, सोनाली कुलकर्णीनं व्यक्त केल्या भावना
सांगलीच्या राजमती क्रीडांगणावर आयोजित भव्य संस्कृती कार्यक्रमात ज्ञानेश्वर मेश्राम यांनी विठ्ठल गीतांवर सर्वांना विठू चरणी लीन केले. नृत्यश्री चॅरिटेबल ट्रस्टच्या धनश्री आपटे यांनी भरत नाट्य सादर करीत सर्वांची मने जिंकली. यानंतर सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने अनेक सुप्रसिद्ध गाण्यांवर नृत्य सादर करीत या महसंस्कृती महोत्सवाची शोभा वाढविली.
सांगली, ३ मार्च २०२४ : सांगलीत महाराष्ट्र सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने सांगली जिल्हा महा संस्कृती महोत्सव पार पडत आहे. आजपासून ते 6 मार्चपर्यंत पार पडणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. पहिल्याच दिवशी विठ्ठल गीते, भरत नाट्यम, लाठी-काठी तसेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या नृत्याविष्काराणे महोत्सवाची जल्लोषी सुरुवात झाली. या सरकारमुळे कलाकारांना राजाश्रय मिळतं असल्याची भावना मराठी सिने तारका सोनाली कुलकर्णी यांनी सांगलीत बोलताना व्यक्त केली. शासनाकडून महसंकृती महोत्सवाच्या निमित्ताने अनेक नामवंत कलाकार तसेच स्थानिक कलाकार आणि त्यांच्या कलाना वाव देण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. राज्यभरात या निमित्ताने फिरत असताना रसिकांचं उदंड प्रतिसाद मिळत असून शासनाच्या अशा उपक्रमांमुळे कलाकारांना राजाश्रय मिळत असल्याचे सोनाली कुलकर्णीने सांगितले. सांगली जिल्हा महा संस्कृती महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, सुमनताई खाडे, अप्पर जिल्हाधिकारी स्वाती देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, मनपा उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.