Tejaswini Pandit टोलच्या मुद्द्यावरून आक्रमक, देवेंद्र फडणवीस यांचं 'ते' वक्तव्य केलं शेअर

Tejaswini Pandit टोलच्या मुद्द्यावरून आक्रमक, देवेंद्र फडणवीस यांचं ‘ते’ वक्तव्य केलं शेअर

| Updated on: Oct 09, 2023 | 10:34 PM

VIDEO | अभिनेत्री तेजस्विनी पंडितची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या टोल दरवाढविरोधातील आंदोलनात उडी घेतली आहे. तेजस्विनी पंडितच्या ट्वीटची सध्या सोशल मिडीयावर चांगलीच चर्चा होतेय. म्हणाली... आम्ही जो टोल भरत आहोत तो कुणाच्या खिशात जातोय? असा थेट सवाल तिनं विचारला

मुंबई, ९ ऑक्टोबर २०२३ | टोलच्या मुद्द्यावरून मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडीत चांगलीच आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या टोल दरवाढीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात तेजस्विनी पंडित हिनं उडी घेतली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे टोलबाबतचं एक वक्तव्य तेजस्विनी पंडित हिनं आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहे. म्हणजेऽऽऽऽऽऽऽ ? यांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत?? मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय? असा सवाल तेजस्विनी पंडित हिने राज्य सरकारला केला आहे. तर मनसे अध्यक्ष राज यांना आवाहन केले की, राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा, महाराष्ट्राला वाचवा ह्या टोल धाडीतून !! राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं कसं वागू शकतात…असेही तेजस्विनी पंडितने ट्वीट केले आहे. तेजस्विनी पंडितच्या या ट्विटची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होतेय.

Published on: Oct 09, 2023 10:20 PM