खासदार निलंबन प्रकरणावर तेजस्विनी पंडित म्हणाली, बिलं पास करुन घ्या, पटापट…
संसदेत गदारोळ केला म्हणून विरोधी पक्षांच्या तब्बल १४१ खासदारांचं दोन दिवसात निलंबन झाल्याचा प्रकार पाहायला मिळाला. या प्रकरणी मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनं ट्वीट करत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. चला बिलं पास करुन घ्या पटापट, असं म्हणत तेजस्विनी पंडित हिनं खोचक भाष्य केलय
मुंबई, २१ डिसेंबर २०२३ : संसदेची सुरक्षा भेदून दोन जण लोकसभेत शिरले. या दोघांनी संसदेच्या गेटवर स्मोक कँडल पेटवत जोरदार घोषणाबाजी केली. यातील महाराष्ट्राच्या लातूरमधील एक जण आहे. यावर गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन द्यावं आणि चर्चा घडवावी अशी मागणी विरोधकांनी संसदेतील अधिवेशनात केली. मात्र संसदेत गदारोळ केला म्हणून विरोधी पक्षांच्या तब्बल १४१ खासदारांचं दोन दिवसात निलंबन झाल्याचा प्रकार पाहायला मिळाला. या प्रकरणी मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनं ट्वीट करत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. चला बिलं पास करुन घ्या पटापट, असं म्हणत तेजस्विनी पंडित हिनं खोचक भाष्य केले आहे. तर मेजॉरिटी तर आधीपासून होतीच आता तर विरोध करायला कुणी नाही….! लोकशाही बसली धाब्यावर !!! हुकूमशाहीचा उदय की अंताकडे प्रवास ?? असा सवालही तिने उपस्थित केला आहे.