गुढीपाडव्याचा नवनीत राणांच्या घरी उत्साह; पारंपारिक पद्धतीने उभारली गुढी

गुढीपाडव्याचा नवनीत राणांच्या घरी उत्साह; पारंपारिक पद्धतीने उभारली गुढी

| Updated on: Mar 22, 2023 | 1:39 PM

आमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या घरी गुढीपाडवा साजरा करण्यात आला. यावेळी खासदार राणा यांनी त्यांच्या नवी दिल्लीतील शासकीय निवासस्थानी गुढी उभारली

नवी दिल्ली : साडे तीन शुभ मुहूर्त पैकी एक मुहूर्त आणि मराठी नवीन वर्षाचा दिवस असल्याने राज्यात सध्या गुढीपाडव्याचा उत्साह पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी शोभा यात्रा काढत लोक आपला आनंद दाखवत आहेत. असाच उत्साह राज्याबाहेरही पहायला मिळत आहे. चक्क दिल्लीत ही गुढीपाडव्याचा उत्साह दिसत असून खासदरांच्या निवासस्थानी गुढी उभारल्याचे दिसत आहे.

आमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या घरी गुढीपाडवा साजरा करण्यात आला. यावेळी खासदार राणा यांनी त्यांच्या नवी दिल्लीतील शासकीय निवासस्थानी गुढी उभारली. तसेच खासदार नवनीत राणा यांनी गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी राजकीय भाष्य करण्याचे टाळले.

Published on: Mar 22, 2023 12:47 PM