Marathi in UP : उत्तर प्रदेशात मराठी भाषा ऐच्छिक करा, भाजप नेते कृपाशंकर सिंह यांची मागणी, योगी सरकारच्या निर्णयाकडे लक्ष
भाजप नेते कृपा शंकर सिंह यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिलंय.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक भाषा म्हणून मराठीचा (Marathi language) समावेश करण्याची विनंती भाजप नेते कृपाशंकर सिंह (Kripashankar Singh) यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली आहे. मात्र, भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी यूपी सरकारला मराठीला पर्यायी भाषेचा दर्जा देण्याचं आवाहन केल्यानं त्यावर योगी सरकार काय निर्णय घेतं, हे पाहणं महत्वाच ठरेल. दरम्यान, मराठी भाषेसाठी नेहमी पुढाकार घेणाऱ्या मनसेनं मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. कृपाशंकर यांनी आपल्या पत्रात म्हटलं की, ‘मराठी भाषा उत्तर प्रदेशात एच्छिक केल्यानं उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात चांगल्या नोकऱ्या मिळण्यास मदत होऊ शकते.’ आता यावर योगी सरकार काय निर्णय घेणार हे पहाणं महत्वाचं ठरेल.
Published on: Jun 08, 2022 11:25 AM
Latest Videos