भाजपमधील बंडखोरी टाळण्यासाठी देवेंद्र फडणवीस मैदानात, बानवकुळेंसोबत मॅरेथॉन बैठका अन्….
विधानसभेचं तिकीट न दिल्याने काही नेत्यांनी बंडखोरी करून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भाजपमधील बंडखोरीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बघा व्हिडीओ नेमकं काय म्हणाले फडणवीस?
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील बंडखोरी टाळण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे मैदानात उतरले आहेत. तर बंडखोरांना समजावून सांगणं हे आमचं कर्तव्य आहे. बंडखोरांना समजवण्यात आम्ही यशस्वी होऊ, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विश्वास व्यक्त करण्यात आला. दरम्यान विधानसभेचं तिकीट न दिल्याने काही नेत्यांनी बंडखोरी करून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भाजपमधील बंडखोरीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विदर्भातील बंडखोरी टाळण्यासाठी काल रात्री फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या मॅरेथॉन बैठका झाल्यात. या बैठकीत फडणवीस आणि बावनकुळेंनी बंडखोरी करणाऱ्या नाराजांची समजूत काढली तर या बैठकीनंतर बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, बोरिवलीतील बंडखोर गोपाळ शेट्टींचीही देवेंद्र फडणवीस भेट घेण्याची शक्यता आहे. मुंबईतील नेत्यांशी चर्चा केल्यानंतरही गोपाळ शेट्टी बंडखोरी करण्यावर ठाम आहे.