मराठवाड्यातील 8 पैकी फक्त एका जागेवर महायुती पुढे, ‘हा’ मतदारसंघ वगळता 7 ठिकाणी महायुतीची पिछेहाट
लोकसभा निवडणुकीचा निकाल येण्यापूर्वी एक्झिट पोल समोर आले. मात्र या एक्झिट पोलमध्ये दाखवलेल्या आकड्यांपेक्षा उलट आकडे आजच्या निकालाच्या कलांमध्ये दिसताय. मराठवाड्यातील एकूण ८ जागांपैकी केवळ एका जागेवर महायुती पुढे असल्याचे पाहायला मिळत आहे.
देशात लोकसभा निवडणूक ही सात टप्प्यात पूर्ण झाली. तर महाराष्ट्रातील मतदान प्रक्रिया ही पाच टप्पात झाली होती. आज या निवडणुकीचा निकाल आणि मतमोजणी सुरू आहे. मराठवाड्यातील मतदार संघात सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. औरंगाबाद, जालना, लातूर, नांदेड, हिंगोली, बीड, धाराशिव, परभणी लोकसभा मतदार संघात कोण विजयी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं असताना महायुतीला मोठा धक्का बसल्याचे समोर आले आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल येण्यापूर्वी एक्झिट पोल समोर आले. मात्र या एक्झिट पोलमध्ये दाखवलेल्या आकड्यांपेक्षा उलट आकडे आजच्या निकालाच्या कलांमध्ये दिसताय. मराठवाड्यातील एकूण ८ जागांपैकी केवळ एका जागेवर महायुती पुढे असल्याचे पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ वगळता इतर ७ जागांवर महायुतीची पिछेहाट पाहायला मिळत आहे. तर महाविकास आघाडी पुढे असल्याचे चित्र सध्या आहे.