वसई विरारकरांच्या प्रश्नासाठी मनसे रस्त्यावर, काय केली मागणी?

वसई विरारकरांच्या प्रश्नासाठी मनसे रस्त्यावर, काय केली मागणी?

| Updated on: Oct 27, 2023 | 5:01 PM

VIDEO |वसई विरारकरांच्या पाणी प्रश्नासाठी आता मनसे रस्त्यावर उतरली आहे. आज पाण्यासाठी महामोर्चा वसई विरार महानगरपालिकेवर काढण्यात आला आहे. या मोर्चाचं नेतृत्व शर्मीला ठाकरे यांनी केल्याचे पाहायला मिळाले. हा मोर्चा आर जे नाका ते वसई-विरार महापालिका असा काढण्यात आलाय.

मुंबई, २७ ऑक्टोबर २०२३ | वसई विरारकरांच्या पाणी प्रश्नासाठी आता मनसे रस्त्यावर उतरली आहे. आज पाण्यासाठी विक्रमी महामोर्चा वसई विरार महानगरपालिकेवर काढण्यात आला आहे. या मोर्चाचं नेतृत्व राजे ठाकरे यांच्या पत्नी शर्मीला ठाकरे यांनी केल्याचे पाहायला मिळाले. वसई विरार क्षेञात आजही नागरीकांना मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. सुर्याप्रकल्पाचा तिस-या टप्प्याचं काम पूर्ण झालं असून, केवळ नेत्यांना उद्घाटनासाठी वेळ नसल्यामुळे पाणी पुरवठा सुरु होतं नाही. यासाठी मनसेनं आज विक्रमी महामोर्चा काढल्याचे पाहायला मिळाले. हा मोर्चा आर जे नाका ते वसई-विरार महापालिका असा काढण्यात आला आहे. पाणी पुरवठा वेळेत करावा, या मागणीसाठी मनसेकडून हा मोर्चा काढण्यात आलाय.

Published on: Oct 27, 2023 05:00 PM