Rajya Sabha | राज्यसभेच्या गोंधळावर मंत्र्यांचा गोंधळ
राज्यसभेत अभूतपूर्व गोंधळ सुरू असतानाच महिला खासदारांना धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यावरून देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाच राज्यसभेतील या गोंधळाचं एक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं आहे. त्यातून राज्यसभेत कशा प्रकारे राडा झाला हेच स्पष्ट होत असल्याचं दिसून येत आहे.

बाहेरून मार्शलला आणून खासदारांना धक्काबुक्की केल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे. त्याच दरम्यान राज्यसभेतील गोंधळाचं सीसीटीव्ही फुटेजही बाहेर आलं आहे. या फुटेजमधून अनेक गोष्टी स्पष्ट होताना दिसत आहेत. विरोधक राज्यसभेतील वेलमध्ये येऊन गोंधळ घालताना दिसत आहेत. यावेळी सभागृहात मार्शल मोठ्या संख्येने उपस्थित असलेले दिसत असून तेही खासदारांना आवर घालत असल्याचं दिसून येत आहे. या गोंधळात खासदार आणि मार्शल दरम्यान धक्काबुक्की होत असल्याचं या व्हिडिओतून स्पष्टपणे दिसून येत आहे.