Santosh Deshmukh : हाणामारी, अपहरण अन् सरपंच संतोष देशमुखांची हत्या… मस्साजोगची A टू Z स्टोरी
सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी बीडचं राजकारण चांगलंच तापलंय. हे सारं प्रकरण सुरू झालं बीडच्या पवनचक्की प्रकल्पाच्या ठिकाणावरून... दरम्यान,सरपंचाच्या हत्येनंतर लोकांचा रोष पाहता बीड पोलिसांचा कारभार वादात सापडला. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंचाच्या हत्येवरून आजही राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी बीडचं राजकारण चांगलंच तापलंय. हे सारं प्रकरण सुरू झालं बीडच्या पवनचक्की प्रकल्पाच्या ठिकाणावरून… केज मधील मस्साजोग गावच्या हद्दीत आवादा कंपनीचा पवनचक्की प्रकल्प आहे. याठिकाणी ६ डिसेंबरला घडलेल्या घटनेचे धागेदोरे सरपंचाच्या हत्येपर्यंत पोहोचले आहेत. ६ डिसेंबरला प्रतिक घुलेसह इतर काही लोकांनी प्रकल्पस्थळी येऊन सुरेश सोनवणे, प्रकल्प अधिकारी शिवाजी शिंदेंना जबर मारहाण केली. आरोपांनुसार या मारहाणीमागे २ कोटी रूपये खंडणीचा उद्देश आहे. मारहाणीनंतर मस्साजोगचे रहिवाशी वॉटमन अशोक सोनवणे यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर ६ तारखेलाच केज पोलीस ठाण्यात घुलेसह इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्याच्या ३ दिवसांनंतर सरपंच संतोष देशमुखांचं अपहरण करण्यात आलं आणि निर्घृण हत्या करण्यात आली. यासंबंधी असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यातील काहींना अटक झाली तर काही फरार आहेत. दरम्यान,सरपंचाच्या हत्येनंतर लोकांचा रोष पाहता बीड पोलिसांचा कारभार वादात सापडला. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट