उल्हासनगरच्या सेंच्युरी कंपनीत भीषण स्फोट, काय कारण अन् किती कामगार दगावले?
VIDEO | उल्हासनगर शहरातील सेंच्युरी रेऑन कंपनीमध्ये भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. या कंपनीतील स्फोटात पाच ते सहा कामगार गुदमरून दगावल्याची माहिती मिळतेय, स्फोटाचं नेमकं कारण काय?
उल्हासनगर, २३ सप्टेंबर २०२३ | उल्हासनगर शहरातील सेंच्युरी रेऑन कंपनीमध्ये भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. याकंपनीत झालेल्या स्फोटात पाच ते सहा कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप स्पष्ट आहे. मात्र सेंच्युरी रेऑन कंपनीमध्ये झालेल्या भीषण स्फोटामुळे उल्हासनगर शहरात एकच खळबळ उडाली आहे. या स्फोटाची माहिती मिळताच कंपनीतील आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. या स्फोटात पाच ते सहा कामगार दगावल्याचं सांगितलं जात आहे. तर जखमींचा आकडा अजून समोर आला नाही. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होत त्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. सध्या फॅक्ट्रीत किती कामगार आहेत याचा अंदाज वर्तविण्यात येत नाही तसेच मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.