उल्हासनगरमधील नामांकित कंपनीत ब्लास्ट, रोहित पवार घटनास्थळी अन् म्हणाले…
VIDEO | उल्हासनगरमधील नामांकित सेंच्युरी रेऑन कंपनीत भीषण ब्लास्ट झाल्याची घटना आज घडली. या नामांकित कंपनीतील भीषण ब्लास्टप्रकरणी रोहित पवार यांनी घटनास्थळी दाखल होत घेतला आढावा, काय दिली प्रतिक्रिया?
ठाणे, २३ सप्टेंबर २०२३ | उल्हासनगर शहरातील सेंच्युरी रेऑन कंपनीमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना आज घडली. दरम्यान, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सेंच्युरी रेऑन कंपनीत झालेल्या स्फोटामधील जखमी कामगारांची भेट घेतली. या घडलेल्या घटनेतील दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन रोहित पवार यांनी दिले आहे. सेंच्युरी रेऑन कंपनीमध्ये चार ते पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे, जखमींना कल्याणच्या फोर्टीज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली तर यामध्ये कंपनी आणि प्रशासन लेबर या दोघं कंपनी संदर्भात चर्चा करण्यात आली असून या घडलेल्या घटनेत जखमींना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नसल्याचे वचनही त्यांनी दिले. या घडलेल्या प्रकरणी योग्य ती कारवाई कंपनीने आणि अधिकाऱ्यांनी करावी, अशी विनंती रोहित पवार यांनी केली. तसंच या स्फोटात जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी रोहित पवार यांनी प्रशासनाकडे केली आहे.

'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल

'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल

रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, 31 तारखेला मुंबईत थर्ड डिग्री?
