मानखुर्दच्या मंडाला भंगार कंपाऊंडमध्ये भीषण अग्नितांडव, परिसरात उडाली खळबळ अन्...

मानखुर्दच्या मंडाला भंगार कंपाऊंडमध्ये भीषण अग्नितांडव, परिसरात उडाली खळबळ अन्…

| Updated on: Apr 18, 2023 | 8:03 AM

VIDEO | मुंबईतील मानखुर्दच्या मंडाला भंगार कंपाऊंडमध्ये भीषण आग, कधी घडली घटना?

मुंबई : मुंबईतील मानखुर्द परिसरात मध्यरात्री एकच खळबळ उडाली. सोमवारी मध्यरात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास मुंबईतील मानखुर्दच्या मंडाला भंगार कंपाऊंडमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. मध्यरात्री ही आग लागल्याने लवकर लक्षात आले नाही. मात्र ज्यावेळी मुंबईतील मानखुर्दच्या मंडाला भंगार कंपाऊंडमध्ये भीषण अग्नितांडव घडले त्यावेळी त्वरीत अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाल्यानंतर त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आणि काही वेळानंतर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि मोठी हानी होण्यापासून बचाव झाला आणि सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, मध्यरात्री अचानक मुंबईतील मानखुर्दच्या मंडाला भंगार कंपाऊंडमध्ये भीषण आग लागल्याने संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Apr 18, 2023 07:57 AM