Mumbai Fire | मानखुर्दच्या मंडाला परिसरात प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग

Mumbai Fire | मानखुर्दच्या मंडाला परिसरात प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग

| Updated on: Nov 12, 2021 | 7:55 AM

मानखुर्द परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भंगाराचे गोदाम आहेत. तसेच या परिसरात लोकवस्ती देखील दाट आहे.  प्लास्टिकच्या गोडाऊनला आग लागल्यानंतर थोड्याच वेळात आगीने रौद्ररूप धारण केले. आग पसरल्यास या भागात मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

मुंबईमध्ये दिवसेंदिवस आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आज पुन्हा एकाद आगीची घटना समोर आली आहे. मानखुर्दच्या मंडाला परिसरातील प्लास्टिकच्या गोडाऊन भिषण आग लागली. पहाटे तीनच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. दरम्यान आगीची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने याची माहिती अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच अग्निशमनदलाच्या 20 गाड्या पाण्याच्या टँकरसह घटनास्थळी हजर झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या घटनेत कुठलीही जीवितहाणी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान मानखुर्द परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भंगाराचे गोदाम आहेत. तसेच या परिसरात लोकवस्ती देखील दाट आहे.  प्लास्टिकच्या गोडाऊनला आग लागल्यानंतर थोड्याच वेळात आगीने रौद्ररूप धारण केले. आग पसरल्यास या भागात मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. नागरिकांनी घटनेची माहिती अग्निशमन दलाला देताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले, सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.