अभिषेक घोसाळकर मॉरिस मैत्रीच्या विश्वासात फसले अन् घात झाला, जाणून घ्या हत्याप्रकरणाची A टू Z कहाणी
अटक होण्यामागे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा हात आहे, अशी मॉरिसची समजूत होती. तर तुरूंगातून बाहेर आल्यानंतर हा राग मॉरिसच्या मनात धगधगत होता. मी अभिषेकला संपवणारच, मॉरिसकडून वारंवार उल्लेख होत असल्याचा मॉरिसच्या पत्नीचा जबाब
मुंबई, ९ फेब्रुवारी २०२४ : पूर्व वैमनस्यातून अभिषेक घोसाळकरांची गुंड मॉरिसने हत्या केली आहे. आणि नंतर स्वतःला ही संपवलं… या घटनेनंतर सगळ्यांचं मन सुन्न झालं. या हत्याप्रकऱणाची जाणून घ्या ए टू झेड कहाणी…. बलात्काराच्या गुन्ह्यात मॉरिस साधारण ५ महिने तुरूंगात होता. अटक होण्यामागे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा हात आहे, अशी मॉरिसची समजूत होती. तर तुरूंगातून बाहेर आल्यानंतर हा राग मॉरिसच्या मनात धगधगत होता. मी अभिषेकला संपवणारच, मॉरिसकडून वारंवार उल्लेख होत असल्याचा जबाब मॉरिसच्या पत्नीने दिला. दरम्यान, तुरूंगातून बाहेर पडल्यानंतर मॉरिसने घोसाळकरांशी पुन्हा मैत्री केली आणि विश्वास संपादन केला. अभिषेक घोसाळकर मैत्रीच्या विश्वासात फसले आणि इथेच त्यांचा घात झाला. मॉरिसने स्वतःसाठी मिश्रा नावाचा एक खासगी सुरक्षारक्षक ठेवला होता. त्यांच्याकडे परवाना असलेली पिस्तुल होती.त्यानेच घोसाळकर यांच्यावर मॉरिसने गोळीबार केला.