दीड वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या सदिच्छा सानेची हत्याच, जीवरक्षकानेच घेतला जीव

दीड वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या सदिच्छा सानेची हत्याच, जीवरक्षकानेच घेतला जीव

| Updated on: Jan 20, 2023 | 12:23 PM

घरातून बेपत्ता असलेल्या सदिच्छा सानेची हत्या जीवरक्षक मिठ्ठू सिंग याने केली, असा धक्कादायक दावा पोलिसांनी केला आहे.

दीड वर्षांपूर्वी 22 वर्षांची तरूणी घरातून बेपत्ता झाली होती. या तरूणीचे नाव सदिच्छा साने असून एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या प्रकरणी तपास सुरू असताना तपासातून सदिच्छा साने या तरूणीची हत्या झाल्याचा खुलासा करण्यात आला आहे. यानंतर या तरूणीच्या मृतदेहाचा शोध सुरू करण्यात आला आहे.

मुंबईतील पालघर येथे सदिच्छा साने राहत होती. घरातून बेपत्ता असलेल्या सदिच्छाची हत्या जीवरक्षक मिठ्ठू सिंग याने केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. सदिच्छा एमबीबीएसचे शिक्षण घेत असून ती नोव्हेंबर 2011 पासून बेपत्ता होती. सदिच्छा परिक्षेसाठी जाते असे सांगून निघाली आणि ती अद्याप घरी परतलीच नाही. तिचा शोध न लागल्याने बोईसर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली, यावेळी तिच्या घरच्यांनी अपहरणाचा संशय व्यक्त केला होता.

Published on: Jan 20, 2023 12:23 PM