Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येला महिना झाला. तरी अद्याप मुख्य आरोपी कोण हे समोर आलेलं नाही. अशातच या हत्येचा मास्टरमाईंड म्हणून वाल्मिक कराड याचं नाव घेतलं जात आहे.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात मोठी बातमी समोर येत आहे. वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येला महिना झाला. तरी अद्याप मुख्य आरोपी कोण हे समोर आलेलं नाही. अशातच या हत्येचा मास्टरमाईंड म्हणून वाल्मिक कराड याचं नाव घेतलं जात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात ८ आरोपींवर मकोका लावण्यात आला होता. मात्र वाल्मिक कराडची यातून सुटका झाली होती. यानंतर मस्साजोगचे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले होचे. काल सरपंच संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं होतं. यावेळी त्यांनी वाल्मिक कराडवर मकोका लावा आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळाला यासाठी मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक होत विविध ठिकाणी मोर्चे देखील काढण्यात आले होते. अखेर आज वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आला आहे. तर वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आल्यानंतर सीआडीकडून कोर्टात अर्ज करण्यात आला आहे. सीआयडीने खुनाच्या गुन्ह्यासाठी कराडची चौकशी करायची आहे. त्यासाठी वाल्मिक कराडला ताब्यात द्या, अशी मागणी सीआयडीकडून करण्यात येत आहे.