छप्पर उडालेल्या अवस्थेत लालपरी रस्त्यावर धावली अन् व्हिडीओ झाला व्हायरल, अखेर...

छप्पर उडालेल्या अवस्थेत लालपरी रस्त्यावर धावली अन् व्हिडीओ झाला व्हायरल, अखेर…

| Updated on: Jul 27, 2023 | 4:22 PM

VIDEO | एसटी महामंडळाच्या लालपरीची दुरावस्था; बसचा व्हिडीओ व्हायरल, संबंधित अधिकाऱ्यावर काय झाली कारवाई?

मुंबई : बुधवारी सकाळी अहेरी आगारातून सहा वाजता ही बस गडचिरोलीहून परत येत असताना पाऊस सुरू होता. यावेळी बसचे छप्पर पूर्णपणे उडल्याचे समोर आले. या बसमध्ये दहा प्रवासी होते आणि पावसाचे पाणी आत येत असल्याने प्रवाशांनी आणि चालकाने छत्री घेऊन जवळपास 50 किलोमीटर ही बस चालविल्याचे चालक प्रदीप मेश्राम यांनी टीव्ही ९ मराठी चॅनलला माहिती दिली. दोन वर्षापासून या बसची दुरावस्था दिसत होती आणि अनेकदा तक्रार केल्यानंतर कोणतीही दुरूस्ती या बसची करण्यात आली नसल्याचा आरोप चालकाने केला. अखेर या प्रकरणाची दखल महामंडळाने घेतली आहे. या नादुरुस्त बसच्या दुरुस्तीचे काम विभागीय कार्यशाळेत विहीत वेळेत न केल्याने संबधीत विभागाचे यंत्र अभियंता शि.रा.बिराजदार यांना महामंडळाने निलंबित केले आहे. तर जनमानसात एसटी महामंडळाची प्रतिमा मलिन करण्यास त्यांना जबाबदार धरुन पुढील चौकशी होईपर्यंत त्यांना निलंबित केल्याचे महामंडळाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

Published on: Jul 27, 2023 04:22 PM