पर्ण, ललित आणि सागरसोबत, आयेशाच्या 'मीडियम Spicy' गप्पा

पर्ण, ललित आणि सागरसोबत, आयेशाच्या ‘मीडियम Spicy’ गप्पा

| Updated on: Jun 13, 2022 | 6:43 PM

आई, वडील, बहीण, मित्र, मैत्रिणी, सहकारी अशा नात्यांची चॉईस जास्त असल्याने कॉम्प्लिकेटेड आयुष्य जगताना काहीशा गोंधळलेल्या मनस्थितीत वावरणाऱ्या एका शेफच्या आयुष्यावर हा चित्रपट बेतलेला आहे असे यातून स्पष्ट होत आहे.

मुंबई: मोहित टाकळकर (Mohit Takalkar) दिग्दर्शित “मीडियम स्पाइसी” ची लज्जतदार झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. “ए शेफ, यार काम काम होता है, लाईफ नहीं” अशा संवादापासून सुरु होणारा हा ट्रेलर सुरुवातीलाच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो. आई, वडील, बहीण, मित्र, मैत्रिणी, सहकारी अशा नात्यांची चॉईस जास्त असल्याने कॉम्प्लिकेटेड (Complicated) आयुष्य जगताना काहीशा गोंधळलेल्या मनस्थितीत वावरणाऱ्या एका शेफच्या (Chef) आयुष्यावर हा चित्रपट बेतलेला आहे असे यातून स्पष्ट होत आहे. साऊथ इंडियन टोन मध्ये बोलणारी शेफ गौरी या दाक्षिणात्य मुलीची भूमिका सई ताम्हणकर हिने साकारली आहे, या निमित्ताने पुन्हा एकदा सईला एका वेगळ्या भूमिकेत पाहायची संधी प्रेक्षकांना लाभली आहे. या चित्रपटासंदर्भात कलाकारांशी संवाद साधलाय आमची प्रतिनिधी आयेशा सय्यद हिने…

Published on: Jun 13, 2022 06:43 PM