देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी बैठक सुरू
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी बैठक सुरू आहे. विधान परिषदेचे उमेदवार प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय हे फडणवीसांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी बैठक सुरू आहे. विधान परिषदेचे उमेदवार प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय हे फडणवीसांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे. भाजप विधान परिषदेच्या सहा जागा लढवण्यावर ठाम आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. शेवटची काही मिनिटं शिल्लक आहेत. राज्यसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता भाजपने विधान परिषदेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. जे राज्यसभेत घडलं त्याचीच पुनरावृत्ती विधान परिषदेत करण्यासाठी भाजप सज्ज झाली आहे. राज्यसभा निवडणुकीत आघाडीची 9 मते फुटली होती. या निवडणुकीत अपक्षांचं मतदान गुप्त असतं. तर पक्षाचं मत पक्षाच्या पोलिंग एजंटला दाखवावं लागतं. मात्र, विधान परिषदेच्या निवडणुकीत संपूर्ण मतदान गुप्त असतं. त्यामुळे राज्यसभेवेळी अपक्ष गळाला लागले, आता थेट आघाडीचेच आमदार गळाला लावून देवेंद्र फडणवीस बाजी मारणार का? अशी चर्चा रंगली आहे.