मुख्यमंत्री फडणवीस-ठाकरे गटाच्या भेटीगाठी वाढल्या; भाजप दक्ष, उद्धव ठाकरेंवर लक्ष?

मुख्यमंत्री फडणवीस-ठाकरे गटाच्या भेटीगाठी वाढल्या; भाजप दक्ष, उद्धव ठाकरेंवर लक्ष?

| Updated on: Jan 13, 2025 | 11:53 AM

निवडणुकीपूर्वी एकमेकांवर टीकास्त्र डागणाऱ्या भाजप आणि ठाकरे गटाच्या भेटीगाठी चांगल्याच वाढल्यात. तसंच भाजपबद्दल ठाकरे गटाच्या मवाळ झालेल्या भूमिकेवरूनही राजकीय वर्तुळात चर्चा होतेय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटातील नेत्यांमध्ये वाढलेल्या भेटींवरून आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील ठाकरे गटाबाबत सावध प्रतिक्रिया देताना दिसताय. निवडणुकीपूर्वी एकमेकांवर टीकास्त्र डागणाऱ्या भाजप आणि ठाकरे गटाच्या भेटीगाठी चांगल्याच वाढल्यात. तसंच भाजपबद्दल ठाकरे गटाच्या मवाळ झालेल्या भूमिकेवरूनही राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. या सर्व चर्चांदरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर शरसंधान साधलंय. एकीकडे एकनाथ शिंदे यांनी भाजप आणि ठाकरे गटाच्या जवळीकतेवरून लक्ष्य केलंय. तर दुसरीकडे भाजपच्या रावसाहेब दानवे यांनी या भेटीगाठीवरून सूचक वक्तव्य केलंय. ‘विकासकामांसाठी हात पुढे केल्यास हात मिळवण्याची आमची तयारी आहे’, असं दानवे म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि ठाकरे गटाच्या भेटीगाठी सुरू आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यामनात नेमकं काय चाललंय? असा सवाल सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

Published on: Jan 13, 2025 11:53 AM