महाराष्ट्राचं शांत वातावरण बिघडवण्यामागं नेमका कोणाचा हात? जितेंद्र आव्हाड म्हणाले…
VIDEO | 'गुन्हा घडल्यानंतर फक्त आमच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल करता', जितेंद्र आव्हाडांनी काय केलं भाष्य
ठाणे : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्या भेटीला आज दाखल झाले होते. या बैठकीत संभाजी नगर येथील सभेबाबत चर्चा झाली असून आणि कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली याबद्दल स्वतः राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, माझी आणि नाना पटोले यांची नेहमीच भेट होत असते. तसे आम्ही फार पूर्वीचे मित्र आहोत. ही भेट आश्चर्यकारक आहे असे काही नाही बदलत्या पार्श्वभूमीवर आणि राजकीय पार्श्वभूमीवर झालेली भेट ही महत्त्वाची आहे, असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले तर ठाण्यातलं वातावरण आणि काँग्रेसचे कार्यकर्त्यांचे आधी बैठक झाली होती. काँग्रेस कार्यकर्त्यांनी कशाप्रकारे त्रास दिला जातोय याचं सविस्तरपणे नाना पटोले यांना सांगितलं आहे. त्यानंतर नाना पटोले हे मला भेटण्यासाठी आले व माझ्याशी देखील बोलले त्यानंतर मी देखील त्यांना सांगितले, कशाप्रकारे सरकारने परिस्थिती बदललेली आहे. पोलीस कायम सांगतात आमच्यावरती प्रेशर आहे परंतु पोलिसांनी अशाप्रकारे दबावाखाली येऊन काम करणारी चुकीचं आहे, असे मतही जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले.