दिल्लीत अडीच तास बैठक, महायुतीचा फॉर्म्युला ठरला? अमित शाहांच्या बैठकीत काय चर्चा?

दिल्लीत अडीच तास बैठक, महायुतीचा फॉर्म्युला ठरला? अमित शाहांच्या बैठकीत काय चर्चा?

| Updated on: Mar 10, 2024 | 11:04 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांमध्ये एकएक जागेवर चर्चा झाली. विजयाच्या मेरिटवरच जागा आणि उमेदवार देणार यावर अमित शाह ठाम असून शिंदे गटाचे काही उमेदवार बदलण्याची अमित शाह यांची सूचना...

मुंबई, १० मार्च २०२४ : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये अडीच तास महायुतीची बैठक झाली. याबैठकीत काही जागांची अदलाबदल करण्याबरोबरच पाच जागा सोडून फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे. ११ तारखेच्या बैठकीत अंतिम शिक्कामोर्तब होण्याचीही शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांमध्ये एकएक जागेवर चर्चा झाली. विजयाच्या मेरिटवरच जागा आणि उमेदवार देणार यावर अमित शाह ठाम असून शिंदे गटाचे काही उमेदवार बदलण्याची सूचनाही शहांनी केल्याची माहिती मिळतेय. तर अजित पवार यांना ४ जागा तर शिंदेंना १० जागा देण्याची भाजपची तयारी आहे. म्हणजेच दिल्लीत अमित शाहांच्या बैठकीनंतर ठरलेल्या सुधारित फॉर्म्युल्यानुसार, भाजप ३४ जागा, शिंदेंच्या शिवसेनेला १० जागा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ४ जागा मिळण्याची शक्यता आहे. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

Published on: Mar 10, 2024 11:04 AM