Sharad Pawar : दिल्लीत शरद पवार आणि बाळासाहेब थोरातांची बैठक, दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा
आज राजधानी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची भेट झाली. थोरात आणि पवार यांच्यात पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक झाली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली.
एकीकडे राज्यातील सत्तांतर आणि अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसल्यानं राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या पार्श्वभूमीवर आज राजधानी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची भेट झाली. थोरात आणि पवार यांच्यात पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक झाली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भविष्यातील वाटचालीवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. दरम्यान, थोरात यांनी पवारांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं की औरंगाबादच्या नामांतराचा विषय अचानक आणला गेला होता. आम्ही भूमिका घेतली होती की मुख्यमंत्र्यांकडे याबाबत चर्चा करुन निर्णय घेतला जाईल. किमान समान कार्यक्रमात हा विषय नव्हता. आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं की हा विषय घेतला जाऊ नये, पण घेतला गेला.