वर्षा बंगल्यावर शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची तातडीची बैठक
आज राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. शरद पवार (Sharad pawar) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्यात आज तातडीची बैठक वर्षा बंगल्यावर पार पडत आहे. या बैठकीला काँग्रेस नेतेही उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई : आज राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. शरद पवार (Sharad pawar) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्यात आज तातडीची बैठक वर्षा बंगल्यावर पार पडत आहे. या बैठकीला काँग्रेस नेतेही उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. कालच पंतप्रधान मोदी (Pm Modi)यांनी चार राज्यातील विजयानंतर ईडीच्या कारवाईंवरून इशारा दिला होता. काही लोक ईडीच्या कारवाईंना धार्मिक रंग देत आहेत. मात्र मी भ्रष्टाचार करणाऱ्यांना सोडणार नाही, असे पवारांचे नाव न घेता मोदींनी म्हटलं होतं. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गोवा, उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यात जोरदार फटका बसला होता. तर भाजपची पुन्हा एकदा सरशी झाली आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात चर्चा होईल, अशी शक्यता वर्तवली जाते आहे.
Published on: Mar 11, 2022 05:23 PM
Latest Videos