SSC Exam Result | दहावीच्या निकालाची वेबसाईट सुरु करण्यासाठी SSC बोर्डाच्या अधिकाऱ्यांची बैठक

| Updated on: Jul 16, 2021 | 7:20 PM

दहावीच्या निकालाची वेबसाईट सुरु करण्यासाठी एसएससी बोर्डाचे प्रयत्न सुरु आहेत. बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील आणि तांत्रिक सदस्यांची बैठक सुरु झाली आहे.

मुंबई : राज्यातील दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 99. 95 टक्के लागला आहे. कोकण विभागाचा निकाल 100 टक्के, मुलांचा निकाल 99.94 टक्के, तर मुलींचा निकाल 99.96 टक्के आहे. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल उपलब्ध होतील, असं सांगण्यात आलं होतं. मात्र, दोन्ही साईट डाऊन झाल्या आहेत.  हा निकाल विद्यार्थ्यांना http://result.mh-ssc.ac.in, http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील. मात्र संध्याकाळी सहा वाजून गेले तरी वेबसाईट सुरुच झाल्या नाहीत. दहावीच्या निकालाची वेबसाईट सुरु करण्यासाठी एसएससी बोर्डाचे प्रयत्न सुरु आहेत. बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील आणि तांत्रिक सदस्यांची बैठक सुरु झाली आहे.