Mumbai | अनिल परब आणि एसटी कामागार संघटनेच्या प्रतिनिधींसोबत बैठक
अनिल परब यांनी आज एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला.
मुंबई: येत्या 20 डिसेंबर रोजी कोर्टात प्रकरण आहे. विलीनीकरणाच्या मुद्द्यावर सरकारला आपलं प्राथमिक म्हणणं मांडायचं आहे, असं सांगतानाच एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावायचा की नाही यावर चर्चा सुरू आहे, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे येत्या 20 तारखेपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावला जाणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. अनिल परब यांनी आज एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्याबाबत चर्चा सुरू आहे. सर्व गोष्टींचा अंदाज घेऊन आणि सर्वांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असं परब यांनी सांगितलं.
Latest Videos