Railway Mega Block | मुंबईकरांनो उद्या बाहेर पडताय? बघा कसा असणार मेगाब्लॉक?
VIDEO | मुंबईकरांनो उद्या मुंबई लोकलचे वेळापत्रक पाहूनच करा प्रवास; तिन्ही मार्गावर कधी असणार मेगाब्लॉक, बघा व्हिडीओ
मुंबई : मुंबईकरांनो उद्या घराबाहेर पडत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मुंबईच्या तिनही मार्गावर उद्या मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर हा मेगाब्लॉक असणार आहे. तिनही मार्गावरील रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर आणि सिग्नल यंत्रणेची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. रविवारी मध्य रेल्वेच्या मुलुंड अप आणि डाऊन धिम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेच्या माहीम- मुंबई सेंट्रल अप जलद मार्गावर रात्रकालीन मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसकालीन ब्लॉक राहणार नाही.
Latest Videos