कोकणवासियांसाठी मोठी बातमी! शिमगोत्सवाकरता रोहा-चिपळूण मार्गावर मेमू, बघा कसं असणार वेळापत्रक

कोकणवासियांसाठी मोठी बातमी! शिमगोत्सवाकरता रोहा-चिपळूण मार्गावर मेमू, बघा कसं असणार वेळापत्रक

| Updated on: Mar 03, 2023 | 8:59 AM

VIDEO | शिमगोत्सवाकरता रोहा-चिपळूण मार्गावर मेमूच्या स्पेशल फेऱ्या, कधीपासून सुरू होणार ही विशेष मेमू

मुंबई : कोकणवासियांसाठी एक मोठी बातमी… येत्या शिमगोत्सवाकरता रोहा-चिपळूण मार्गावर विशेष मेमू टेनच्या फेऱ्या चालवण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला असून उद्यापासून म्हणजेच 4 मार्च ते 12 मार्चपर्यंत मेमू स्पेशल टेनच्या नियमित 12 फेऱ्या धावणार आहे. शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ट्रेनला होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्ये रेल्वेने ही अतिरिक्त गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेतला आहे. ही मेमू स्पेशल ट्रेन माणगाव, वीर, सापेवामणे, करंजाडी, विन्हेरे, खेड स्थानकात थांबणार आहे. रोहा चिपळूणदरम्यान 12 मेमू सेवा जाहीर करून चाकरमान्यांना मध्य रेल्वेनं मोठा दिलासा दिला आहे. त्यानुसार, 01597/01598 ही मेमू रोहा येथून रोज सकाळी 11.05 वाजता सुटून त्याचदिवशी दुपारी 1.20 वाजता चिपळूणमध्ये दाखल होईल. तर चिपळूण येथून दुपारी 1.45 वाजता सुटून त्याचदिवशी सायंकाळी 4.10 वाजता रोहा येथे पोहचणार आहे.

Published on: Mar 03, 2023 08:59 AM