Merry Christmas 2023 : मुंबईतील वांद्र्याच्या माऊंट मेरी चर्चमध्ये कसा आहे नाताळचा उत्साह?

Merry Christmas 2023 : मुंबईतील वांद्र्याच्या माऊंट मेरी चर्चमध्ये कसा आहे नाताळचा उत्साह?

| Updated on: Dec 25, 2023 | 6:14 PM

२४ डिसेंबरच्या पूर्वसंध्येलाच या चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांसह इतर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळाली. माऊंट मेरी चर्चची नाताळ निमित्त भरणारी जत्रा मुंबईकरांसाठी मोठे आकर्षण असते. नाताळ निमित्त माऊंट मेरी चर्चमध्ये सकाळपासून पर्यटकांची गर्दी व्हायला सुरुवात

मुंबई, २५ डिसेंबर २०२३ : मुंबईतील वांद्रे येथील १०० हून अधिक वर्ष जुन्या माऊंट मेरी बेसलिका चर्चमध्येही नाताळचा उत्साह मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. २४ डिसेंबरच्या पूर्वसंध्येलाच या चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांसह इतर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळाली. माऊंट मेरी चर्चची नाताळ निमित्त भरणारी जत्रा मुंबईकरांसाठी मोठे आकर्षण असते. नाताळ निमित्त माऊंट मेरी चर्चमध्ये सकाळपासून पर्यटकांची गर्दी व्हायला सुरुवात झाली होती. यावेळी चर्चला करण्यात आलेली आकर्षक सजावच पाहून तरुणाई सेल्फी घेण्यात झाली मग्न झाली होती. तर संपुर्ण परिसरात फुलांची सजावट आणि रोषणाई केलेली आहे. भगवान येशु ख्रिस्तांच्या जन्मदिनानिमित्ताने प्रार्थना करण्यासाठी ख्रिश्चन बांधव आणि पर्यटक माऊंट मेरीत दाखल होत असतात. नाताळ सणानिमित्ताने एकमेकांना शुभेच्छा आणि भेटवस्तू येथे दिल्या जातात. बघा कसा आहे या चर्चमध्ये नाताळचा उत्साह..

Published on: Dec 25, 2023 06:14 PM