Merry Christmas 2023 : इगतपुरीतील ब्रिटिश कालीन सॅक्रेट हार्ट चर्चमध्ये येथू ख्रिस्तच्या जन्माचा नयनरम्य देखावा अन् रोषणाई
इगतपुरी शहरातील ख्रिस्ती बांधवांतर्फे देखील नाताळ हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. नाशिक येथील १५० वर्ष पुरातन ब्रिटिश काळापासून असलेल्या सॅक्रेट हार्ट चर्चला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
नाशिक, २५ डिसेंबर २०२३ : 25 डिसेंबर हा दिवस प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस म्हणजे नाताळ हा सण साजरा केला जातो. ख्रिस्ती बांधवांचा हा सण असल्याने ते मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतात. इगतपुरी शहरातील ख्रिस्ती बांधवांतर्फे देखील नाताळ हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. नाशिक येथील १५० वर्ष पुरातन ब्रिटिश काळापासून असलेल्या सॅक्रेट हार्ट चर्च यासह इतर चर्च व धार्मिक स्थळांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तर येशू ख्रिस्ताच्या जन्माचा नयनरम्य देखावा चर्चच्या वतीने साकारण्यात आला आहे. रंगरंगोटी करून सर्वच धार्मिक स्थळ ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.
Published on: Dec 25, 2023 11:39 AM
Latest Videos