Heavy Rain Alert | हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट !

Heavy Rain Alert | हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट !

| Updated on: Jun 09, 2021 | 6:23 PM

मुंबई तसेच कोकणात पुढील काही काळासाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रागयड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला असून येथे मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. 

मुंबई  : राज्यात सध्या अनेक भागात पाऊस पडतो आहे. मुंबईमध्ये सांताक्रूज परिसरात पाणीच पाणी झाले आहे. तर वडाळा परिसरात ट्रॅफिक जाम झाले आहे. किंग सर्कलमध्येसुद्धा अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. असे असताना मुंबई तसेच कोकणात पुढील काही काळासाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रागयड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला असून येथे मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. (meteorological department announced heavy rain and red alert in mumbai sindhudurg thane district)