Maharashtra Rain : पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पाऊस? कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट?

Maharashtra Rain : पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पाऊस? कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट?

| Updated on: Sep 27, 2023 | 6:26 PM

VIDEO | राज्यभरात पुन्हा पाऊस सक्रिय होणार, अनेक जिल्ह्यांत पुढील चार दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. तर राज्यातील हवामान खात्याकडून कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट? बघा व्हिडीओ हवामान खात्यानं काय वर्तवला अंदाज?

पुणे, २७ सप्टेंबर २०२३ | राज्यासह पुणे शहर आणि जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा पाऊस बरसण्यास सुरूवात झाली आहे. राज्यातील पुण्यासह घाटमाथ्यावर जोरदार पाऊस कोसळताना दिसतोय. दरम्यान, राज्यात येत्या ४ दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसेच अनेक जिल्ह्यांत पुढील चार दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर अंनत चतुर्दशीच्या दिवशी देखील राज्यभर वरूणराजा बरसणार आहे. उद्या पुणे शहरासह जिल्ह्यात यलो अलर्ट तर कोकणातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि दक्षिण कोकणात ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. पुण्यात हवामान खात्याने उद्या मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. उद्या मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मेघगर्जनासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे तर सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यभर जोरदार पावसाचा इशाराही वर्तविण्यात आला आहे.

Published on: Sep 27, 2023 06:26 PM