महाराष्ट्रात मान्सून व्यापण्यास विलंब होणार? हवामान विभागानं काय वर्तविला अंदाज
VIDEO | बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून कोकणात रखडला, हवामान खात्यानं काय म्हटलं?
रत्नागिरी : बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून कोकणातच रखडला आहे. मान्सुनची रेषा रत्नागिरी पर्यतच कायम आहे. त्यामुळे मान्सून अद्याप पुढे सरकलेला नाही. १८ जूननंतर मान्सुनला गती मिळण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. नैऋत्य मोसमी पावसाच्या पुढच्या प्रवासासाठी १८ ते २१ जूनदरम्यान अनुकूल परिस्थिती अरबी समुद्रात निर्माण होईल. रत्नागिरीत वेगवान वारे वाहत आहेत. तुरळक पावसाच्या सरी रत्नागिरीत पडतायत. रत्नागिरीकरांना देखील दमदार पावसांच्या सरींची प्रतीक्षाच आहे. महाराष्ट्राला मान्सून व्यापण्यास विलंब होणार असल्याचा हवामना विभागाचा अंदाज आहे. दरम्यान, या चक्रीवादळाने मान्सूनवर परिणाम केला आहे. राज्यात मान्सून ११ जून रोजी कोकणात दाखल झाला होता. त्यानंतर १५ जूनपर्यंत मान्सून राज्यभर पोहचणार होता. परंतु मान्सून अजूनही सक्रीय झालेला नाही. तो थांबला आहे. त्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.