Pune Metro | पुणे मेट्रोच्या पहिल्या मार्गाच्या उद्घाटनासाठी मेट्रो प्रशासन सज्ज

Pune Metro | पुणे मेट्रोच्या पहिल्या मार्गाच्या उद्घाटनासाठी मेट्रो प्रशासन सज्ज

| Updated on: Mar 05, 2022 | 3:31 PM

गेले कित्येक वर्षे मेट्रोची (Metro) प्रतीक्षा करणाऱ्या पिंपरी चिंचवडकरांची ही प्रतीक्षा अखेर संपलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते उद्या मेट्रोचे ऑनलाइन (Online) पद्धतीने उद्घाटन होत आहे.

गेले कित्येक वर्षे मेट्रोची (Metro) प्रतीक्षा करणाऱ्या पिंपरी चिंचवडकरांची ही प्रतीक्षा अखेर संपलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते उद्या मेट्रोचे ऑनलाइन (Online) पद्धतीने उद्घाटन होत आहे. पिंपरी ते फुगेवाडी हा मार्ग प्रवाशांना खुला होणार आहे. उद्घाटनाची तयारी युद्ध पातळीवर सुरू आहे. कोणतीही तांत्रिक अडचण होऊ नये, यासाठी मेट्रो प्रशासन सज्ज झाले आहे. सकाळी अकरा वाजता ऑनलाइन पद्धतीनं हे उद्घाटन होणार असून पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन ते फुगेवाडी यादरम्यान पाच स्टेशन्स असणार आहेत. तर जवळपास सात किलोमीटरचे अंतर ही मेट्रो कापणार आहे. दरम्यान मेट्रो प्रशासन या ऑनलाइन उद्घाटनाच्या कामात व्यस्त आहे. पुणेकर, पिंपरी चिंचवडच्या नागरिकांची मेट्रोने प्रवास करण्याची अनेक दिवसांपासूनची प्रतीक्षा आता संपली असून मेट्रोच्या प्रवासाचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकारणार आहे.