म्हाडा परीक्षा पेपर फुटी प्रकरण, बुलडाण्यातून आणखी दोघांना घेतले ताब्यात
म्हाडा परीक्षाचे पेपर फुटल्याचा संशय असल्याने परीक्षा रद्द करण्यात आली होती. याबाबत मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी परीक्षा रद्द करत असल्याची घोषणा केली होती. मात्र आता या प्रकरणातील आरोपींची पुणे पोलिसांकडून धडपकड सुरू आहे.
पुणे : म्हाडा परीक्षाचे पेपर फुटल्याचा संशय असल्याने परीक्षा रद्द करण्यात आली होती. याबाबत मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी परीक्षा रद्द करत असल्याची घोषणा केली होती. मात्र आता या प्रकरणातील आरोपींची पुणे पोलिसांकडून धडपकड सुरू असून, आज बुलडाण्यातून आणखी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या प्रितीश देशमुखच्या चौकशीतून या दोघांची नावे समोर आली आहेत. पुणे पोलिसांनी त्यांना बुलडाण्यातून ताब्यात घेतले आहे.
Latest Videos