Mhada Lottery 2023 Mumbai : म्हाडाच्या घरांची जाहिरात पाहून सर्वसामान्यांचं भंगलं स्वप्न, लॉजिकच कळेना
VIDEO | Mhada Lottery 2023 Mumbai : म्हाडा सामान्यांचं पण घर असामान्यांसाठी? आता सर्वसामान्यांचं स्वप्न कसं पूर्ण होणार, बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : मुंबई म्हाडाची जाहीरात बघून सध्या सामान्यांचे डोळे विस्फारलेत. कारण बऱ्याच ठिकाणी उत्पन्न गट आणि घराची किंमत याचा काहीच ताळमेळ लागत नाहीये. काही स्कीममध्ये महिन्याला ७५ हजार कमावणारी व्यक्ती महिन्याला ९० हजारांचा हफ्ता कसा भरणार असा सामान्यांना प्रश्न पडली. म्हाडा म्हणजे सर्वसामान्यांना परवडणारी घरं…असं ब्रीद वाक्य असणाऱ्या संस्थेने आता न परवडणारी घरं केल्यास त्यात काही नवल नाही. मुंबई ज्या लॉटरीची डोळे लावून वाट पाहत असतात ती लॉटरी जाहीर झालीये. मात्र घराचे भाव बघून सामान्यांचे स्वप्न भंगल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या दीड वर्षात त्याच घरांची किंमत ११ लाखांनी महाग झालीत. मोजक्या स्कीम सोडल्या तर उत्पन्न गट आणि घरांच्या किंमतीत मोठा गोंधळ आहे. म्हणजेच अल्प गटासाठी म्हाडाने ज्या घराच्या किंमती निर्धारित केल्यात त्याचा कोणताच हिशेब लागत नाहीये. म्हणजे म्हाडा म्हणतंय वार्षिक उत्पन्न ९ लाख असणाऱ्यांना अल्पगटात ग्राह्य ठरले जाणार आहे. याचाच अर्थ ज्याचा महिन्याला पगार ७५ हजार असेल तो अल्प गटात घर घेऊ शकतो. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट…