MHADA Lottery : म्हाडाच्या घरांची सोडत लांबणीवर जाण्याची शक्यता, जाणून घ्या कारण
म्हाडाच्या घरासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. आता या बातमीमुळे म्हाडाचं घर घेणाऱ्यांच्या चिंतेत भर पडू शकते.
मुंबई : म्हाडाची (mhada house), सिडकोची (Cidco) घरं ही सर्वसामान्यांना परवडणारी असतात. या घरांच्या लॉटरीची (MHADA Lottery) मध्यमवर्गीय वाट पाहत असतात. कमी पैशांमध्ये राहण्याजोगं घर मिळावं यासाठी सर्वसामान्य म्हाडाच्या घरांसाठी प्रयत्न करतात. सरकारची योजना असल्यानं कुठलाही धोका होण्याची शक्यता नसते. मात्र, या म्हाडाच्या घरासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. आता या बातमीमुळे म्हाडाचं घर घेणाऱ्यांच्या चिंतेत भर पडू शकते. म्हाडाची घरं घेणाऱ्यांना आणखी वाट पहावी लागू शकते. कारण म्हाडाच्या घरांची सोडत ही लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. कोकण मंडळाकडून घरांची जुळवाजुळव सुरू असल्याची माहिती आहे. तर उत्पन मर्यादेत केलेल्या बदलामुळे ही सोडत लांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे म्हाडाची घरं घेणाऱ्यांना आणखी वाट पहावी लागू शकते.
Published on: May 28, 2022 01:03 PM
Latest Videos