सर्वपक्षीय संबंध आले कामी, अखेर ठाकरेंचे शिलेदार मिलिंद नार्वेकरच विजयी
विधानपरिषदेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंकडे स्वतःचे फक्त १६ मतं असताना देखील नार्वेकर निवडणुकीच्या मैदानात उतरले पहिल्या पसंतीचा कोटा मिळाला नाही पण दुसऱ्या पसंतीच्या कोटामुळे मिलिंद नार्वेकर विजयी झाले आणि शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव झाला. उद्धव ठाकरेंचे खास आणि विश्वासू मिलिंद नार्वेकर अखेर आमदार झालेत.
विधान परिषदेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर विजयी झाले. त्यांना पहिल्या पसंतीचा कोटा मिळाला नाही पण दुसऱ्या पसंतीच्या कोटामुळे मिलिंद नार्वेकर विजयी झाले आणि शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव झाला. उद्धव ठाकरेंचे खास आणि विश्वासू मिलिंद नार्वेकर अखेर आमदार झालेत. विधानपरिषदेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंकडे स्वतःचे फक्त १६ मतं असताना देखील नार्वेकर निवडणुकीच्या मैदानात उतरले. अर्थात काँग्रेसशी अधिकची मतं नार्वेकरांच्या कामी आलीत आणि नार्वेकरांचा विजय झाला. दरम्यान मिलिंद नार्वेकर यांचे सर्वपक्षीय संबंध काही लपून नाहीत. एकनाथ शिंदे यांच्यापासून सर्वच पक्षांसोबत वैयक्तिक संबंध आहे. त्याची झलक मतदानाला सुरूवात झाल्यापासून दिसली. विधानपरिषदेत दाखल झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत चर्चा करताना दिसले. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट