मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? महायुतीची मोठी ऑफर काय?
मिलिंद नार्वेकर यांना महायुतीकडून मोठी ऑफर देण्यात आल्याची माहिती मिळतेय. दक्षिण मुंबईतून मिलिंद नार्वेकर यांना लोकसभा निवडणूक लढण्याची ऑफर देण्यात आली आहे. या ऑफरमुळे मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंची साथ सोडणार का? की ठाकरे गटाला धक्का देणार? अशा चर्चा रंगताय...
उद्धव ठाकरे यांचे सर्वात जवळचे आणि विश्वासू सहकारी मानले जाणारे मिलिंद नार्वेकर यांना महायुतीकडून मोठी ऑफर देण्यात आल्याची माहिती मिळतेय. दक्षिण मुंबईतून मिलिंद नार्वेकर यांना लोकसभा निवडणूक लढण्याची ऑफर देण्यात आली आहे. या ऑफरमुळे मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंची साथ सोडणार का? की ठाकरे गटाला धक्का देणार? अशा चर्चा सध्या रंगताना दिसतोय. दरम्यान, सध्या दक्षिण मुंबईची जागा ही शिंदे गटाकडे आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईची जागा मिलिंद नार्वेकर शिंदे गटाकडून लढू शकतात, अशी चर्चा आहे. तर महायुतीकडून दक्षिण मुंबईत मिलिंद नार्वेकर यांचं नाव चर्चेत असल्याची सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मिलिंद नार्वेकर यांना ऑफर देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. इतकंच नाहीतर शिंदे गट ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत.
Published on: Apr 21, 2024 02:06 PM
Latest Videos