Ministers On Private hospital treatment | मंत्र्यांचे उपचार; बिलं सरकारच्या माथी
रुग्णालयातील उपचाराच्या खर्चाचं बिलही या मंत्र्यांनी सरकारकडे सादर केलं आहे. हे बिल लाखांच्या घरात आहे. त्यामुळे या मंत्र्यांची पोलखोल झाली आहे. विशेष म्हणजे यात सर्वाधिक बिलं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचेच आहे. त्यांनी उपचारावर 34 लाख 40 हजार 930 रुपयांचा खर्च झाल्याचं दाखवलं आहे.
मुंबई : कोरोनाच्या संसर्गाच्या कालावधीत राज्यात अनेक ठिकाणी बेडचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. बेड मिळत नसल्यामुळे कित्येक रुग्णांना रुग्णालयांच्या खेटा घालाव्या लागल्या. यामुळे लोकांमधून संताप व्यक्त केला जात होता. मात्र, त्याचवेळी दुसरीकडे राज्याचे मंत्री मात्र कोरोना झाल्याने जनतेच्या पैशातून फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उपचार घेत होते. रुग्णालयातील उपचाराच्या खर्चाचं बिलही या मंत्र्यांनी सरकारकडे सादर केलं आहे. हे बिल लाखांच्या घरात आहे. त्यामुळे या मंत्र्यांची पोलखोल झाली आहे. विशेष म्हणजे यात सर्वाधिक बिलं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचेच आहे. त्यांनी उपचारावर 34 लाख 40 हजार 930 रुपयांचा खर्च झाल्याचं दाखवलं आहे.
Latest Videos