चंदन लागवडीचे आमिष दाखवून शेतकऱ्यांना लाखोंचा गंडा
रक्त चंदनाचे झाड लावण्यासाठी प्रति झाड तुम्ही 200 रुपये भरा. त्याबल्यात तुम्हाला 200 हजार रुपये अनुदान देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे समोर आलंय.
शेतकऱ्यांनो सावधान,राज्यात चंदन लागवडीचे आमिष दाखवून गंडा घालणारी टोळी सक्रिय झाली असून नाशिकच्या देवळा,चांदवड व मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सुमारे 60 ते 60 लाखांना गंडा घालण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. सध्या पुष्पा चित्रपटातील डायलॉग गाजताहेत त्यात रक्त चंदनाच्या तस्करीची मिळणारे करोडो रुपयांचे गारुड सध्या अनेकांवर आहे. नेमकी हीच बाब हेरुन तामिळनाडूतून आल्याची बतावणी करून श्री लक्ष्मी गणपती नर्सरीच्या नावाची कंपनी नावाने 7 ते 8 ठकानी देवळा, मालेगाव व चांदवड तालुक्यातील हद्दीवरील गिरणारे , कुंभारडे , झाडी , कोकणखेडे ,उसवाड या गावातील शेतकऱ्यांना रक्त चंदनाची लागवड करण्याचे आमिष दाखवून गंडा घालून पोबारा केल्याने गुंतवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे. रक्त चंदनाचे झाड लावण्यासाठी प्रति झाड तुम्ही 200 रुपये भरा. त्याबल्यात तुम्हाला 200 हजार रुपये अनुदान देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे समोर आलंय.