‘गिरीश महाजन यांना अक्कल आहे की नाही?’, कुणी काढली भाजप नेत्याची अक्कल
VIDEO | मी सॉफ्ट टार्गेट, उद्धव ठाकरे यांच्या सभेत माझंच नाव राहिलं; कुणी सोडलं टीकास्त्र
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या दोन गटातील राड्याबाबत भाजपनेते गिरीश महाजन यांनी वक्तव्य करताना असे म्हटले होते की, गेल्या काही दिवसांपूर्वी संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांनी जे आंदोलनं केले त्यामुळे असे प्रकार घडत आहे. यावर खासदार इम्तियाज जलील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. गिरीश महाजन यांच्याकडे महत्वाचे खाते आहे. त्यांना काही अक्कल आहे का नाही असं वाटत आहे? मी संभाजीनगरमध्ये लोकशाहीच्या मार्गानं आंदोलन केलं. संभाजीनगरमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर मोठं कॅडल लाँग मार्च काढला, त्यानंतर विभागीय आयुक्तांच्या कार्यालयासमोर भव्य आंदोलन केलं,या तिन्ही आंदोलनात कोणताही गैरप्रकार घडला नाही. दरम्यान, यावेळी कोणतीच भडकावू भाषणं केली नाही, तरी देखील इम्तियाज जलील २९ लोकांसह १५०० अनोळखी लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला, असेही एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले तर देशात इम्तियाज जलीलसाठी वेगळा कायदा आहे, आणि तुमच्या अतुल सावे, संदीपान भुमरे साठी वेगळा कायदा आहे का? असा सवालही इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे.